केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना कोरोना!

0
20201027_140040

मुंबई, दि. 27 ऑक्टोबर:
रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना कोरोनाची लागण झाली आहे.आज त्यांच्या कोविड चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

वैद्यकीय सल्ल्यानुसार मुंबईत एका खाजगी रुग्णालयात आठवले चार दिवसांसाठी दाखल झाले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. कोरोनाची लक्षणे नाहीत, कार्यकर्ते तसेच चाहत्यांनी काळजी करू नये आहे आवाहन करण्यात आले आहे.

कोरोना निदान झाल्याने रिपब्लिकन पक्षाचे कार्यक्रम  आणि शासकीय बैठकांचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याचे रिपाइंच्या वतीने अधिकृत प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

कालच रामदास आठवले यांच्या उपस्थितीत अभिनेत्री पायल घोष हिच्यासह अनेकांचा रिपाइं पक्ष प्रवेश कार्यक्रम पार पडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *