उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोना!
मुंबई, दि. 26 ऑक्टोबर:
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. दोन तीन दिवसापासून ते होम क्वारंटाइनच होते. कोरोनाची लागण झाली हे आज स्वतः उपमुख्यमंत्री यांनी ट्विट केले आहे.
या ट्विटमध्ये अजित पवार म्हणतात, ‘माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे. राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्याश्या विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन’.
ठाकरे सरकार मधील मंत्री धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, वर्षा गायकवाड, बाळासाहेब पाटील, या मंत्र्यांना कोरोना ची लागण झाली होती.
