अशी झाली आहे फडणवीसांची अवस्था !
मुंबई दि. १९ ऑक्टोबर:
कोंबडा आरवला नाही तरी सकाळ व्हायची थांबत नाही आणि झोपला तरी सकाळ होण्याचे थांबत नाही त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची त्या कोंबड्यासारखी अवस्था झाली असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.
माझ्यामुळे इतर पक्षाचे लोक बाहेर फिरायला लागले असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्याला जोरदार प्रत्युत्तर नवाब मलिक यांनी दिले आहे. कोंबडयाला वाटतं मी आरवलो नाही तर सकाळ होणार नाही तसं होत नाही. कोंबडा झोपला तरी सकाळ होते हे देवेंद्र फडणवीस यांनी लक्षात घ्यायला हवे असेही नवाब मलिक म्हणाले.
आमचे नेते पवारसाहेब असतील किंवा मंत्री शेतकरी अडचणीत आल्यावर त्यांना धीर देण्यासाठी शेताच्या बांधावर जावून धीर देणं ही पक्षाची सुरुवातीपासूनची भूमिका आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस सांगत आहेत तर त्यांची अवस्था त्या कोंबड्यासारखी झाली आहे असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला.
