20201010_170407

मुंबई, दि. 10 ऑक्टोबर:
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “पुणे महापालिकेतील सत्तेबाबत अजित पवारांना जर काही स्वप्न पडत असतील तर यासंदर्भात ऊर्जा वाया घालवू नका आम्ही पण तुमचे बाप आहोत,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
कोथरूड येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते.

पाटील म्हणाले, “पुणे महानगरपालिकेत झालेल्या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत १६ पैकी ११ ठिकाणी भाजपाचे सदस्य विजयी झाले. तर एक जागा टॉसवर काँग्रेसकडे गेली तर चार जागी राष्ट्रवादी काँग्रेस विजयी झाला. या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काहीतरी जादू करून सर्व जागांवर भाजपाचे अध्यक्ष झाले पाहिजे होते. मात्र, तसे झाले नाही. पण अजित पवार यांना पुढची काही तरी स्वप्नं पडत आहेत, त्यांनी जास्त ऊर्जा वाया घालवू नये आम्ही देखील अजित पवार यांचे बाप आहोत,” असा टोला लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *