राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इनकमिंग!
मुंबई दि. ३० सप्टेंबर:
रत्नागिरी जिल्ह्यातील रमेश कदम तसेच भाजपातून आलेले उस्मान मोमीन, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष शशिकांत मोकल व उषा चौधरी यांनी आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. यावेळी खासदार सुनिल तटकरे, राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार शेखर निकम, सरचिटणीस बसवराज पाटील, माजी आमदार संजय कदम तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आदरणीय खासदार पवार साहेबांच्या प्रयत्नांनी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. यानंतर अनेक मान्यवरांनी पक्षात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण राजकारण हे बेरजेचे करायचे वजाबाकी, भागाकाराचे नाही असे सूचक वक्तव्य प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी केले.
पक्ष बळकट करण्यासाठी आपले चौफेर प्रयत्न सुरू आहेत. आदरणीय खासदार पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची अनेकांची इच्छा आहे. पक्ष सोडून गेलेल्यांनीही घरवापसीची इच्छा प्रकट केलीय. त्यामुळे सर्व चांगल्या प्रवृत्तीचे लोक पक्षात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत असेही जयंत पाटील म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून रमेश कदम यांचे पक्षाला पाठबळ लाभले. काही कारणांमुळे मधल्या काळात ते वेगळे झाले. मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक निवडणुकांमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. कोकणात आता पक्ष मजबुतीसाठी त्यांच्यासह पुन्हा जोमाने कामास सुरुवात करू असे खासदार सुनिल तटकरे यांनी यावेळी सांगितले.
