कोरटकर दुबईला पळून गेल्याची बातमी दिशाभूल करणारी.
मुंबई, दि. २२ मार्च ;
कोरटकर दुबईला पळून गेला ही बातमी दिशाभूल करणारी आहे…तो दुबईला गेला असे सांगून जे फोटो दाखवले जात आहेत ते फोटो त्यानेच त्याच्या इन्स्टा अकाउंट वर नोव्हेंबर 2023 ला अपलोड केलेले आहेत.
कोरटकरच्या पहिल्याच दिवशी मुस्क्या आवळायच्या सोडून त्याला सुरक्षा प्रदान करण्याची ऑर्डर कोणी निर्गमित केली याचे उत्तर फडणवीस यांनी द्यायला हवे असा प्रश्न शिवसेना प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी विचारला आहे.
सुषमा अंधारे पुढे असे म्हणतात की, ज्या नागपूर मध्ये दंगल झाली तो महल म्हणजे गडकरींचा मोहल्ला फडणवीसांचे गाव आणि बावनकुळे पालकमंत्री असणारा जिल्हा. या जिल्ह्यातली दंगलीची घटना अंगाशी येते म्हणून भाजपा रोज नव्या सणसणाटी बातम्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र गेली तीन दिवस सातत्याने ते तोंडघशी पडत आहेत.
भाजपचा कपटी खेळ समजून घ्या. करोडो रुपये खर्चून जे अधिवेशन भरवले जाते त्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थी, शेतकरी, महिला, सुशिक्षित बेरोजगार शाळेत शिकणारी मुलं, एप्रिल मे मधील पाणीटंचाई यावर कुठलीही चर्चा होत नाही. जाणीवपूर्वक मुद्दे डायव्हर्ट केले जात आहेत असेही अंधारे म्हणाल्या.