• Wed. Apr 30th, 2025

Xtralarge News

आपल्या माणसांचा आवाज

धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही

ByXtralarge News

Mar 22, 2025
Visits: 45 Today: 2 Total: 4221930

धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही..

मुंबई, दि.  २२ मार्च :

अपात्र झोपडीधारकांनाही मुंबईतच घर देणारा धारावी पुनर्विकास हा एकमेव प्रकल्प असून धारावील एक इंचही जागा अदानीला देण्यात आलेली नाही, असे सरकारच्या वतीने कॅबिनेट मंत्री एँड आशिष शेलार यांनी विधानसभेत स्पष्ट केले.

विधानसभेत मांडण्यात आलेल्या 293 च्या चर्चेला सरकारतर्फे मंत्री एँड आशिष शेलार यांनी उत्तर दिले. यावेळी सदस्यांकडून धारावी बाबत उपस्थित करण्यात आलेल्या विविध शंका आणि प्रश्नांना उत्तर देताना मंत्री शेलार यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केले.

धारावीतील एकुण 430 एकरमधील जागेपैकी 37 टक्‍के जागेत खेळाचे मैदान, मनोरंजन मैदान यारखी मोकळी जागा मुंबईकरांना मिळणार आहे. धारावीतील जागा अदानीला दिली असा कांगावा करणा-यांना हे माहित नाही काय, धारावीतल्या या सगळ्या जागेची मालकी धारावी पुर्नविकास प्राधिकरण (डिआरपी) नावाच्‍या राज्य सरकारने स्‍थापन केलेल्‍या कंपनीची आहे. त्यामुळे खोटे बोलणाऱ्यांनी अदानीच्या नावाने एक सातबारा दाखवा, असे ही ठणकावून सांगितले.

डि.आर.पी.पी.एल ही कंपनी पुनर्विकासाची कंत्राटदार म्हणून काम करणार आहे. त्‍यामुळे कंत्राटदाराला निवेदेनुसार जे फायदे असणारच आहेत त्‍या फायद्यातील 20 टक्‍के हिस्सा राज्य सरकारला मिळणार आहे.तसेच धारावीतील जवळजवळ 50% जागा ही महापालिकेच्‍या मालकीची आहे तर काही राज्य सरकार आणि केंद्र सरकारची जागा आहे. ज्या जागा मालकाची जागा तुम्ही झोपडपट्टी पुनर्विकासाला घेतली जाते त्याला त्या जागेच्या रेडी रेकनरच्या 25% एवढी किंमत मिळते. याच नियमानुसार मुंबई महापालिकेसह सरकारच्या ज्या प्राधिकरणाच्या आहेत त्यांना पंचवीस टक्के मिळणार आहेत. तसेच पात्र झोपडपट्टी धारकांना धारावीत तर अपात्र झोपडपट्टी धारकांना मुंबईतच घरे मिळणार आहेत. अशा प्रकारे घरे देणारा हा एकमेव प्रकल्प आहे, असेही त्यांनी सांगितले.

मुंबईतील रेल्वे झोपडपट्टीचे पुनर्वसन व्हावे म्हणून सरकारने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली कमिटी गठीत केली असून त्याच्या बैठका झाल्या असून केंद्र सरकारकडेही पत्रव्यवहार व बैठक घेऊन समन्वय साधला जात आहे, असेही मंत्री शेलार यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *