• Thu. Mar 13th, 2025

Xtralarge News

आपल्या माणसांचा आवाज

Visits: 2 Today: 2 Total: 4116149

एसटी कर्मचाऱ्यांना पगार वेळेत द्या

मुंबई, दि. १३ मार्च –

एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नाही. त्यांना ठरलेल्या तारखेला व वेळेत पगार मिळावा यासाठी राज्य सरकार कृती आराखडा तयार करणार का? आणि एसटी कर्मचाऱ्यांना न्याय देणार का? असा सवाल भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी आज सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासावेळी उपस्थित केला.

विधानपरिषदेचे सदस्य परिणय फुके यांनी राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेली रक्कम भविष्य निर्वाह निधी विश्वस्त मंडळामध्ये जमा केले नसल्याबाबत प्रश्न उपस्थित केला. या चर्चेत सहभाग घेत आ. दरेकर म्हणाले कि, एसटी कर्मचाऱ्यांना वेळेत पगार मिळत नाही. सातत्याने पगाराला वेळ लागतो. मीही एका एसटी कंडक्टरचा मुलगा आहे. एसटीच्या असणाऱ्या जागांसाठी यंत्रणा निर्माण करा आणि एसटी कर्मचाऱ्यांचा पगार वेळेत ठरलेल्या तारखेला कसा मिळेल यासंदर्भात कृती योजना, आराखडा शासनाने बनवावा. तो कृती आराखडा शासन करणार का? असा सवाल दरेकरांनी केला.

दरेकर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले कि, दरेकर यांच्या सूचनेच्या अनुषंगाने लवकरात लवकर कृती आराखडा तयार करू असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *