• Wed. Apr 30th, 2025

Xtralarge News

आपल्या माणसांचा आवाज

Visits: 103 Today: 1 Total: 4221961

तूर खरेदी नोंदणीसाठी 30 दिवसांची मुदतवाढ.

मुंबई, दि. २६ फेब्रुवारी :

हंगाम 2024-25 मधील हमीभावाने तूर खरेदीसाठी 24 जानेवारी 2025 पासून पुढे 30 दिवसांपर्यंत शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणीबाबत कळविण्यात आले होते. ही मुदत आणखी 30 दिवस वाढविण्यात येत असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे.

 

24 फेब्रुवारी 2025 अखेर राज्यात 29 हजार 254 शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून 161 शेतकऱ्यांकडून 1813.86 क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. उर्वरित शेतकऱ्यांना नोंदणी करता यावी यादृष्टीने ही मुदतवाढ देण्यात आली असल्याचे जयकुमार रावल यांनी सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *