• Tue. Mar 11th, 2025

Xtralarge News

आपल्या माणसांचा आवाज

Visits: 62 Today: 5 Total: 4113201

राखेच्या बेकायदेशीर साठयांवर कारवाई करा.

बीड, दि ०७ फेब्रुवारी ;

प्रदूषणाच्या नियमाचा भंग होत असल्याने औष्णिक विद्युत केंद्राच्या परिसरातील राखेच्या बेकायदेशीर साठयांवर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. जप्त केलेली वाळू शासकीय घरकुलाच्या बांधकामासाठी उपलब्ध करून द्यावी असे निर्देशही देत प्रदुषण नियंत्रणाकडे दुर्लक्ष करत असलेल्या अधिकाऱ्यांची त्यांनी कान उघाडणी केली.

 

जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रगती सभागृहात जिल्हयातील अवैध वाळू व तत्सम गौण खनिज उत्खणनामुळे होणारा पर्यावरणाचा –हास, बीड जिल्हयातील अवैध डोंगर पोखरल्यामुळे होणारी पर्यावरणाची हानी तसेच औष्णिक वीज प्रकल्प, परळी येथे होणा-या राखेच्या वाहतुकीमुळे होणारे प्रदुषण आदी विषयांवर ना. पंकजाताई मुंडे यांनी सर्व संबधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

वीट भट्यासाठी मोकळया हायवामधून होणा-या अवैध वाहतुकीमुळे प्रदुषण वाढत असून याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे तसेच खाली सांडलेल्या राखेमुळे वातवरणीय बदल रोखण्यासाठी बंद हायवामधून ही वाहतूक होईल याकडे संबधितांनी लक्ष घालून तसा अहवाल सादर करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

चिमणीपासूनचे प्रदुषण नियत्रंणात असले तरी राख उचलणे हे संबधित अधिका-यांचे दायित्व आहे याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. राखेचे अनाधिकृत साठे सील करावेत. वाहतुकीचे नियम सर्वानी पाळावेत, राखेची वाहतुक गावातुन न करता ती बायबासनी करावी. दाऊतपूर एरियामध्ये किती राख आहे. याचे रेकार्ड ठेवणे राखेचा साठा आजमितीला आहे तेवढाच पुढील तपासणीपर्यंत असायला हवा नसता संबधितावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असेही याप्रसंगी पंकजाताई मुंडे यांनी सांगितले.

वाळू, दगड, माती, मुरुम इत्तर खडी याची अवैध वाहतूक करणा-या किती लोकांवर कारवाई केली तसेच वाळू घाटाची संख्या किती. जप्त केलेली वाळू ही पंडीत दीन दयाळ उपाध्याय घरकूल योजनेसाठी वापरावी. गौण खणिजाचे अवैध उत्खणनावर प्रतिबंध घालावा. डोंगराचे अवैध उत्खनन करणा-यानां दंड करावा, दर तीन महिन्याला याचा अहवाल सादर करावा. डोंगराखाली होणारी प्लॉटींग अवैध असल्यास त्यावर प्रतिबंध घालावा. डोंगर पोखरल्यामुळे खाली राहणा-या कुंटूंबावर दरड कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही असेही त्या यावेळी म्हणाल्या

या बैठकीस जिल्हाधिकारी अविनाश पाठक, जिल्हा पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत,निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपविभागीय अधिकारी कविता जाधव संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मंत्री महोदयांना पॉवर पाईटव्दारे (पीपीटीव्दारे) माहिती देण्यात आली बैठकीचे प्रस्ताविक आभार जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी मानले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *