• Sat. Feb 8th, 2025

Xtralarge News

आपल्या माणसांचा आवाज

बीड अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना ST कडून १० लाखांची मदत!

Visits: 21 Today: 3 Total: 4040229

बीड अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना ST कडून १० लाखांची मदत!

मुंबई : दि. २० जानेवारी;

बीड – परभणी मार्गावर धावणाऱ्या एसटी बसला घोडका राजुरी येथील स्वराज हॉटेल जवळ झालेल्या भीषण अपघातामध्ये ३ तरुण मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना अत्यंत वेदनादायक असून मृत्यूमुखी पडलेल्या तरुणांच्या कुटुंबीयांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत! दुर्दैवाने अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची आयुष्य आपण परत आणू शकत नाही, परंतु त्यांच्या कुटुंबीयांवर कोसळलेला दुःखाचा डोंगर पाहता, फुल ना फुलाची पाकळी म्हणून एस.टी. महामंडळाकडून त्यांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची मदत देण्याची निर्देश परिवहन मंत्री म्हणून मी एसटी प्रशासनाला दिली आहेत. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

बीड- परभणी मार्गावर पहाटे ६ च्या दरम्यान पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या ३ तरुण मुलांना एसटी बसची धडक बसली. सकाळच्या धुक्यामुळे धावण्याचा सराव करणारी मुले चालकाला दिसली नाहीत, असे चालकाचे म्हणणे आहे. दुर्दैवाने या अपघातामध्ये त्या तीनही मुलांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे बीड आणि परिसरामध्ये शोककळा पसरली आहे. यावेळी एस.टी. महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर ,बीडचे आमदार संदीप क्षीरसागर आणि बीडचे माजी शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्याशी चर्चा करून मृत्युमुखी पडलेल्या मुलांच्या नातेवाईकांना एस.टी. तर्फे प्रत्येकी १० लाखाची मदत देऊ केली आहे. तसेच शासनातर्फे त्यांच्या कुटुंबीयांना जे काय मदत करणे शक्य होईल, ती मदत करण्यास आम्ही तत्पर आहोत, असे आश्वासन मंत्री सरनाईकांने दिले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *