• Sat. Feb 8th, 2025

Xtralarge News

आपल्या माणसांचा आवाज

CRDAI ने  ST ची जमीन विकसित करावी!

ByXtralarge News

Jan 19, 2025
Visits: 63 Today: 2 Total: 4040310

CRDAI ने  ST ची जमीन विकसित करावी!

मुंबई, दि. १९ जानेवारी;

राज्यभरात पसरलेल्या एसटीच्या 1360 हेक्टर जमिनीचा विकास करण्यासाठी क्रीडाई (CRDAI) या संस्थेने आपला योगदान द्यावे. असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. ते महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीज ने भरवलेल्या प्रदर्शनाला भेट देते प्रसंगी बोलत होते.

एसटी महामंडळाचे राज्यभरात 842 ठिकाणी 1360 हेक्टर जमीन उपलब्ध आहे. त्याचे आम्ही शहरी, निम-शहरी आणि ग्रामीण असे वर्गीकरण केले असून बांधा वापरा आणि हस्तांतरित करा अथवा खाजगी सार्वजनिक भागीदारी तत्त्वावर या जमिनी विकसित करून तेथे एसटी महामंडळाला आवश्यक असलेली बसस्थानके, आगार आणि आस्थापना कार्यालय संबंधित विकासाकाकडून बांधून घेणे त्याचबरोबर जिल्ह्याच्या ठिकाणी किमान 100 खाटांचे अद्यावत रुग्णालय, इलेक्ट्रिक बस चार्जिंग स्टेशन, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि सोलर पॅनल सारखे पर्यावरण पूरक प्रकल्प उभारणे अपेक्षित आहे.

या बदल्यात संबंधित विकासाकाला त्या जमिनीवर त्याच्या सोयीनुसार व्यवसायिक क्षेत्र विकसित करता येईल. अशा पध्दतीचे सर्वसमावेशक धोरण लवकरच एसटी महामंडळ आणणार असून यासाठी सूचना आणि प्रस्ताव क्रीडाई यासारख्या देशातील रिअल इस्टेट क्षेत्रातील नामवंत संस्थेने द्यावेत असे आवाहन यावेळी मंत्री सरनाईक यांनी केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *