कल्याण-डोंबिवली पाणीपुरवठा योजनेला मंजुरी.
ठाणे, दि. ३ जानेवारी २०२५;
कल्याण डोंबिवलीसह नव्याने समाविष्ट झालेल्या २७ गावांसाठी अमृत योजनेंतर्गत ३५७ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही पाणी पुरवठा योजना करण्याबाबत कल्याण डोंबिवली करांना शब्द दिला होता तो त्यांनी पूर्ण आहे. कल्याण डोंबिवलीच्या विकासासाठी यापुढेही सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.
केंद्र शासनाचे भक्कम पाठबळ राज्याला मिळत असून राज्य शासन केंद्र शासनाच्या योजनांची यशस्वी अंमलबजावणी करीत असल्याचे ते म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून संपूर्ण राज्यासह ठाणे जिल्हा आणि कल्याण डोंबिवली परिसराचा अधिक वेगाने विकास होईल असा विश्वासही खासदार डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला आहे.