• Fri. Mar 14th, 2025

Xtralarge News

आपल्या माणसांचा आवाज

उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून नववर्षाच्या शुभेच्छा..

Visits: 221 Today: 1 Total: 4117416

उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून नववर्षाच्या शुभेच्छा..

 

मुंबई, दि. १ जानेवारी २०२५ :-

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला 2025 नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. येणारं नवीन वर्ष राज्यातील जनतेला विकासाच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देणारं, महाराष्ट्राला सर्वांगीण प्रगतीच्या वाटेवर घेऊन जाणारं ठरेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात व्यक्त केला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, महाराष्ट्रवासियांची एकजूट आणि निर्धाराच्या बळावर आपण आतापर्यंत राज्यावर येणाऱ्या प्रत्येक आव्हानांचा यशस्वी मुकाबला केला. महाराष्ट्राची ही एकजूट यापुढेही कायम ठेवायची आहे.

कृषी, उद्योग व्यापार, शिक्षण, सहकार, कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती, सामाजिक सुधारणा अशा अनेक क्षेत्रात महाराष्ट्र नेहमीच देशात अव्वल राहिला आहे. महाराष्ट्राचं हे अव्वल स्थान कायम ठेवण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करूया. शिव-शाहू-फुले-आंबेडकर या महामानवांच्या विचारांवर सुरू असलेली वाटचाल कायम ठेवून महाराष्ट्राला, देशाला विकासाच्या दृष्टिकोनातून आणखी गतिमान करूया, असं सांगतानाच नववर्षाचे स्वागत उत्साहाने मात्र आरोग्यभान राखत संयमाने करा, असं आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *