विनोद तावडेंच्या विरार नोटकांड प्रकरणी गुन्हे दाखल..
मंबई,दि. २० नोव्हेंबर,
नालासोपारा विधानसभा मतदारसंघ, जिल्हा पालघर येथील वेदांता हॉटेल या ठिकाणी पैसे वाटपाच्या तक्रारीवरुन भरारी पथक आणि पोलीस यांनी तपासणी करुन ३ गुन्हे दाखल केलेले आहेत.
मतदान संपण्यापूर्वी ४८ तास प्रचार शांतता कालावधीमध्ये आपल्या मतदार संघाव्यतिरिक्त दुसऱ्या मतदार संघामध्ये राजकीय पक्षाच्या व उमेदवाराच्या प्रचाराकामी थांबणे अपेक्षित नाही. त्याबाबत भारतीय न्याय संहिता कलम 223 आणि लोक प्रतिनिधीत्व कायदा कलम 126 नुसार गुन्हा दाखल (FIR 826/2024 तुळींज पोलीस ठाणे, नालासोपारा)
प्रचार शांतता कालावधीमध्ये पत्रकार परिषद घेणेबद्दल भारतीय न्याय संहिता कलम 223 आणि लोकप्रतिनिधीत्व कायदा कलम 126 इत्यादी कलमान्वये गुन्हा दाखल . (FIR 828/2024 तुळींज पोलीस ठाणे, नालासोपारा)
घटनेच्या ठिकाणी भरारी पथकामार्फत हॉटेलमध्ये रुमची तपासणीमध्ये जप्त झालेली रक्कम रु.9,93,500/-गुन्हा दाखल. (FIR 827/2024 तुळींज पोलीस ठाणे, नालासोपारा) भारतीय न्याय संहिता 173 आणि लोकप्रतिनिधीत्व कायदा 126 यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला.