रामदास आठवलेंच्या महाराष्ट्रात ६० जाहीर सभा
मुंबई दि. २० नोव्हेंबर –
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे महायुती ची बुलंद तोफ ठरले. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत रामदास आठवले यांनी 13 दिवसांत संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून महायुतीचा झंझावाती प्रचार करताना महाविकास आघाडी ने महायुतीवर केलेले आरोप खोडून काढले. राज्यात रामदास आठवले यांनी वेगवान प्रचार करून 13 दिवसांत मुंबई ठाणे; कोकण; पश्चिम महाराष्ट्र; उत्तर महाराष्ट्र ; पूर्व आणि पश्चिम विदर्भ; मराठवाडा असा सर्व महारष्ट्र पिंजून काढत 60 पेक्षा जास्त सभा महायुतीसाठी घेतल्या.
महायुतीची बुलंद तोफ होऊन रामदास आठवले हे महाविकास आघाडीवर तुटून पडत होते.राज्यात महायुती चा प्रचार करताना कधी चार्टर्ड फ्लाईट तर कधी हेलिकॉप्टरने ते सभेला वेळेवर पोहोचत होते.पुण्यात ताडिवाला रोड येथे भाजप महायुती उमेदवार सुनील कांबळे यांच्या प्रचार रॅलीत प्रचंड गर्दीत होती.तेथील गल्ल्या अरुंद होत्या.पुणे कँटोन्मेंट चा प्रचार आटोपून ना.रामदास आठवलेंना पुढे सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारासाठी छत्रपती शिवाजी नगर येथे जायचे होते. ताडीवाला रोड वस्ती मध्ये गर्दी प्रचंड झाली होती रस्ते म्हणजे छोट्या अरुंद गल्ल्या.त्यातून वाट काढून बाहेर यायचे होते.त्यावेळी ना.रामदास आठवले यांनी स्वतः शक्कल लढवून रिक्षात बसले सोबत पुण्याचे रिपाइं शहर अध्यक्ष संजय सोनवणे आणि रिपाइं चे प्रसिद्धी प्रमुख हेमंत रणपिसे हे त्या रिक्षात बसले.त्या रिक्षातून रामदास आठवले यांनी ताडीवाला रोड वर महायुतीचे उमेदवार सुनील कांबळे यांचा प्रचार करून मुख्य रस्त्यावर पंचशील चौकात आले तिथे त्यांच्या गाड्यांचा ताफा आला. त्यानंतर पुढे महायुती चे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारासाठी छत्रपती शिवाजी नगर येथे पोहोचले.
दलित बहुजनांचे संघर्षनायक रामदास आठवले हे मिळेल त्या वाहनाने प्रवास करीत आजवर पुढे आलेले राष्ट्रीय नेतृत्व आहे.त्यांना भाजप महायुती ने या विधानसभा निवडणुकीत स्टार प्रचारक चा दर्जा दिला नाही.तरीही महायुती च्या कोणत्याही स्टार प्रचारका पेक्षा अधिक सभांची मागणी हे रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांच्या सभांची होती.राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यातील महायुती चे उमेदवार आपल्या मतदार संघात ना.रामदास आठवले यांची प्रचार सभा व्हावी अशी आग्रही मागणी करीत होते.अहमदनगर मधील राहुरी चे शिवाजीराव कर्डिले आपल्या प्रचार सभेत जाहीर म्हणाले होते की माझ्या प्रचाराच्या शुभारंभाचा ना.रामदास आठवले यांचे पाय लागले म्हणजे मी निवडून आलो याची मला खात्री आहे.कारण यापूर्वी ही गोपीनाथ मुंडे असताना.रामदास आठवले यांनीच माझ्या प्रचाराचा शुभारंभ केला होता त्यांचे माझ्या मतदार संघात पाय लागणे म्हणजे मी विजयी होणार हे निश्चित झाले आहे.
20 नोव्हेंबर रोजी विधानसभेच्या निवडणुकीचे मतदान आहे .कोण जिंकणार कोण हरणार? महायुती ची की महाविकास आघाडी चे सत्ता येणार हे जनता जनार्दन ठरवेल. मात्र या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत रामदास आठवले यांच्या भाषणांना जनतेतून मोठा प्रतिसाद मिळत होता .रामदास आठवले हे महायुती चे स्टार प्रचारक नसले तरी महायुती चे ते सुपरस्टार ठरले आहेत.