• Wed. Dec 4th, 2024

Xtralarge News

आपल्या माणसांचा आवाज

Visits: 23 Today: 1 Total: 3911669

राहुल गांधींच्या मंगळवारी महाराष्ट्रात २ प्रचारसभा..

मुंबई, दि. ११ नोव्हेंबर ;

लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी उद्या मंगळवार दिनांक १२ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या दौ-यावर येत असून या दौऱ्यात ते दोन प्रचारसभा घेणार आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे काँग्रेस उमेदवार राहुल बोंद्रे आणि खामगावचे उमेदवार राणा दिलीप सानंदा यांच्यासाठी आणि गोंदिया येथे काँग्रेसचे उमेदवार गोपालदास अग्रवाल यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा होणार आहेत.

 

मंगळवारी सकाळी ९.३० वाजता राहुल गांधी यांचे विशेष विमानाने छत्रपती संभाजी नगरमध्ये आगमन होईल तिथून ते हेलिकॉप्टरने चिखली येथे पोहोचतील. दुपारी १२ वाजता ते सभेला संबोधित करतील. त्यानंतर दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी ते गोंदिया येथे प्रचारसभेला संबोधित करतील व संध्याकाळी ४.५० वाजता गोंदियाहून दिल्लीकडे प्रयाण करतील.

 

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने आता वेग घेतला असून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्या प्रचार सभाही राज्याच्या विविध भागात आयोजित करण्यात आल्या आहेत. याआधी ६ नोव्हेंबर रोजी राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात येऊन नागपूर येथे संविधान संमेलनाला संबोधित केले होते व त्यानंतर संध्याकाळी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील प्रचारसभेत महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या ५ गॅरंटी जाहीर केल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *