• Thu. Oct 10th, 2024

Xtralarge News

आपल्या माणसांचा आवाज

लाडकी बहीण योजनेसाठी सप्टेंबरमध्ये ही नोंदणी.

ByXtralarge News

Sep 3, 2024
Visits: 146 Today: 2 Total: 3834064

लाडकी बहीण योजनेसाठी सप्टेंबरमध्ये ही नोंदणी.

मुंबई, दि. 3 सप्टेंबर;

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेसाठी राज्यातील पात्र महिलांना आता सप्टेंबर २०२४ मध्येही नोंदणी करता येणार आहे . ही नोंदणी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली.

मंत्री तटकरे म्हणाल्या की, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णय भूमिका मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यापूर्वी दि. ३१ ऑगस्ट २०२४ पर्यत नोंदणी करण्यास मुदत देण्यात आली होती. आता ही नोंदणी सप्टेंबर २०२४ मध्येही सुरू राहणारआहे. तरी अधिकाधिक महिलांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *