नांदेडचे काँग्रेस खासदार वसंतराव चव्हाणांचे निधन.

0
IMG-20240826-WA0003

मुंबई दि. २६ ॲागस्ट :

नांदेडचे काँग्रेस खासदार वसंतराव चव्हाणांचे निधन झाले आहे. मागील काही दिवसापासून त्यांची प्रकृती ठीक नसल्याने हैदराबादच्या हाॅस्पिपलमध्ये ते उपचार घेत होते पण सोमवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.

आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून जनसामान्यांच्या हितासाठी लढणारे नांदेड लोकसभेचे खा. वसंतराव चव्हाण यांच्या निधनाने एक अनुभवी व मनमिळावू नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली आहे.

 

खा. चव्हाण यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करून चेन्नीथला म्हणाले की, गावचा सरपंच, आमदार, लोकसभा खासदार अशी चव्हाण यांची प्रदीर्घ राजकीय कारकीर्द राहिली आहे. मनमिळावू स्वभाव, प्रचंड लोकसंग्रह, जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण आणि ते सोडवण्याची तळमळ यामुळे त्यांना कायम जनतेचा मोठा पाठिंबा मिळाला. लोकसभा निवडणुकीत मोठे नेते पक्ष सोडून गेले असता त्यांनी कार्यकर्त्यांच्या बळावर पक्ष संघटना मजबूत करून मोठा विजय मिळवला. त्यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली असून आपण सहकारी मित्र गमावला आहे.

खा. वसंतराव चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून काँग्रेस पक्ष चव्हाण कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे असे चेन्नीथला म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *