दिव्यांग विद्यापीठ स्थापनेचा अहवाल सादर करा..

0
IMG-20240725-WA0139

मुंबई,दि. २६ जुलै;

दिव्यांग विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणे सोयीचे व्हावे, यासाठी स्वतंत्र दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यासाठी समिती गठीत केली आहे. यासमितीने 15 ऑगस्टपर्यत तातडीने अहवाल राज्य शासनाकडे सादर करावा असे, आदेश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

मंत्रालयात दिव्यांग विद्यापीठ निर्मितीसंदर्भात मंत्री उच्च व तंत्रशिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीला आमदार बच्चू कडू,आमदार प्रसाद लाड,उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी समितीचे, उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकार, अध्यक्ष डॉ.मुरलीधर चांदेकर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले,राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यासाठी उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने माजी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांग विद्यापीठ स्थापनेसाठी आवश्यक सोयी सुविधांचा अभ्यास करण्यासाठी समितीची नियुक्त करण्यात आली आहे. यासमितीने सविस्तर अहवाल दि.१५ ऑगस्ट २०२४ पर्यत राज्य शासनाकडे तातडीने अहवाल सादर करावा, हा अहवाल मंत्रिमंडळासमोर ठेऊन यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल,आणि लवकरच स्वतंत्र दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यात येईल असेही, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *