• Mon. Jan 20th, 2025

Xtralarge News

आपल्या माणसांचा आवाज

Visits: 299 Today: 1 Total: 4007877

सोलापूर, दि. १५ जुलै :

आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पंढरपुरच्या विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन राज्याच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली. महाराष्ट्र बेरोजगारी आणि शेतकरी आत्महत्या मुक्त व्हावा, असे साकडे घालून राज्यातील सामाजिक सलोखा कायम ठेवण्याची सुबुद्धी सत्ताधा-यांना दे, अशी प्रार्थनाही नाना पटोले यांनी केली.

विठुरायाचे दर्शन घेण्याआधी नाना पटोले यांनी पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली येथे जगतगुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेतले. तसेच बाजीराव विहीर येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाले. दिंडीत पायी चालताना पटोलेंनी वारक-यांसह पाऊल खेळण्याचा आनंद घेतला.

नाना पटोले यांनी मंगळवेढा येथे श्री संत गजानन महाराज पालखीचे दर्शन घेतले. ज्ञानोबा माउली तुकाराम आणि ‘गण गण गणात बोते’ च्या गजरात सभोवतालचा संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. परंपरेनुसार नाना पटोले दरवर्षी पालख्यांचे आगमन झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात जाऊन पालख्यांचे दर्शन घेतात व वारकऱ्यांबरोबर विठुमाऊलीच्या भक्तीत रमतात.

सोलापूरवरून पंढरपूरकडे जात असताना पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथे ग्रामस्थांकडून नाना पटोले यांचे स्वागत करुन सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *