• Wed. Oct 30th, 2024

Xtralarge News

आपल्या माणसांचा आवाज

Visits: 74 Today: 1 Total: 3861543

मुंबई दि. ११ जुलै:

राज्यात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. पाच वर्षांपूर्वी विरोधी गटाचे फक्त ६ लोक निवडून आले होते. लोकांनी मोदीचे सरकार पाहिले आणि हे बदलण्याचा निर्णय घेतला. यावेळी ३१ जणांना निवडून दिलं आहे. या ३१ पैकी राष्ट्रवादीच्या १० पैकी ८ जागा निवडून आल्या आहे आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या २८८ पैकी २२५ जागा निवडून येतील, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.

लातूर जिल्ह्यातील उदगीर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ,कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे, आमदार राजेश टोपे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमामध्ये बोलताना शरद पवार म्हणाले की, शेतकरी, शेतमजूर, व्यापारी त्या सगळ्याना सोबत घेऊ.. देशात आपले राज्य प्रगत करूयात. निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यरत आहे. महाराष्ट्राची स्थिती बदलायची असेल तर राष्ट्रवादी पक्षाला बळ दिलं पाहिजे, असच सगळ्यांना वाटत आहे. आजच्या प्रवेशाचे वैशिष्ट्य आहे. एक उदगीरचे आणि दुसरे देवळालीचे आहेत. या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचा उमेदवार लोकांनी निवडून दिला खरा पण दोन्ही विजयी उमेदवारांनी लोकांचा घात केला. लोकांना काही गोष्टी आवडत नाहीत. तुम्ही येताना वेगळ्या नावाने मतं मागता आणि जाता दुसरीकडे हे लोकांना पटत नाही. ज्यांनी जनतेचा घात केला त्या लोकांना धडा शिकवायचा या भावनेनं अपल्याकडे यायचा निर्णय घेतला त्यांचं स्वागत करतो. असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

जयंत पाटील म्हणाले की, लातूरमध्ये ऑगस्ट महिन्यात मोठा कार्यक्रम होणार आहे उदगीर आणि अहमदपूर मध्ये, देवळाली मतदार संघ येथील सुद्धा नाशिकचे काही लोक आले आहेत. अजित पवार यांच्या सोबत गेलेले काही कार्यकर्ते आज परत येत आहेत नाशिक येथील देवळाली मतदारसंघ काहीही झाले तर जिंकायचा आहे. ही तुतारी आम्ही सुधाकर भालेराव आम्ही तुमच्या हातात देत आहोत. लातूर जिल्ह्यात मदत होईल पण राज्यात सुद्धा मातंग समाज सोबत आला पाहिजे. सुधाकर भालेराव यांच्यावर आमचे बऱ्याच दिवसापासून लक्ष होते, त्या मतदारसंघात आमच्या सहकाऱ्यांची चलबिचल होती. पण, विचारांचा पक्का माणूस आम्ही हुडकत होतो, मातंग समाजाचे देखील नेतृत्व त्यांनी केलंय. ते १० वर्ष विधिमंडळात देखील ते होते. तसेच, महाराष्ट्रातून संघटन देखील त्यांनी निर्माण केलं आहे. पवार साहेबांनी २०१९ सालीच सामाजिक न्याय खातं मागितलं होतं. मागे राहिलेल्या घटकांसाठी विशेष प्रयत्न आपण करूयात. विकासासाठी आपण काय करतोय? अल्पसंख्याक देखील आपण मागून घेतलं. ज्यांच्यावर जबाबदारी दिली होती त्यांच्यावर देखील गोष्टी अवलंबून असतात, असे जयंत पाटील यांनी म्हटले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *