• Wed. Apr 30th, 2025

Xtralarge News

आपल्या माणसांचा आवाज

Visits: 95 Today: 1 Total: 4222108

मुंबई, दि. १३ जून :

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले असले तरी यापेक्षाही अधिक यश मिळू शकले असते. आता विधानसभा निवडणुकीत आघाडी म्हणून लढताना मेरीटनुसारच जागा वाटप झाले तर चांगला निकाल लागू शकतो. काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी म्हणूनच विधानसभा निवडणूक लढवणार असून राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघातील संघटनात्मक बांधणीवर भर देणार असून राज्यातील भाजपाचे भ्रष्ट सरकार सत्तेबाहेर काढणे हाच उद्देश आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अधक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

 

नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसने राज्यातील सर्व ४८ जागांवर संघटनात्मक बांधणी केली होती, त्याचा फायदा काँग्रेस पक्षाबरोबरच महाविकास आघाडीला झाला. आताही विधान सभेसाठी २८८ जागांवर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. एकत्रित लढायचे असेल तरी संघटनात्मक तयारी करायला लागते. काँग्रेसने सर्व जागांवर तयारी केली तर त्याचा फायदा मित्रपक्षांनाही होणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावेळी मेरिटचा विचार केला असता तर आणखी चांगले परिणाम दिसले असते. राज्यातील भाजपा सरकारला सत्तेतून बाहेर काढणे हेच महत्वाचे आहे. महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या नावाने योजना करुन कोट्यवधी रुपये लुटले आहेत. डीबीटी योजनेतून टेंडर न काढता मुख्यमंत्र्यांनी खरेदी करुन लुट केली. सरकारकडे शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे नाहीत पण त्यांच्या नावावर लुट मात्र सुरु आहे. बांधकाम विभागाच्या जागा तारण ठेवून त्यावर कर्ज काढले आहे. राज्याच्या जनतेला कर्जात डूबवण्याचे काम सुरु आहे, या सर्व मुद्द्यांवर अधिवेशनात सरकारला जाब विचारु असेही नाना पटोले म्हणाले.

पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, छगन भुजबळांना त्रास होत आहे हे स्पष्ट दिसत आहे, भाजपा हा ओबीसीची नेतृत्वाची नेहमीच अवहेलना करते आला आहे. ओबीसी नेता भाजपाच्या सानिध्यात असेल तर त्याला टार्गेट केले जाणारच. गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत काय घडले हे सर्वांनी पाहिले आहे. याच छगन भुजबळांना जेलमध्ये टाकले होते, त्यावेळी ते डाकू होते आता ते संन्यासी झाले आहेत. भाजपाला ओबीसींची मते हवी आहेत नेते मात्र नको आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *