• Sat. Jul 13th, 2024

Xtralarge News

आपल्या माणसांचा आवाज

NCP कडून सुनेत्रा पवारांचा राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज..

ByXtralarge News

Jun 13, 2024
Visits: 28 Today: 1 Total: 3643746

मुंबई दि. १३ जून –

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी दिलेल्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाल्याने आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सुनेत्रा अजित पवार यांचा राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी माध्यमांना दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या संसदीय मंडळाची बैठक बुधवारी रात्री पार पडली. या बैठकीत एकमताने सुनेत्रा अजित पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले. सुनेत्रा अजित पवार यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर चर्चा केली आणि आज अर्ज दाखल करत असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दूरध्वनीवरून दिली असल्याचेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

आज पोटनिवडणूक जाहीर झाली आहे त्याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल हे खासदार होते. ते पुन्हा एकदा निवडणूक लढवून खासदार झाले त्यामुळे त्यांनी राजीनामा दिलेली जागा रिक्त झाली होती. आणि म्हणून एकमताने सुनेत्रा अजित पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले त्यामुळे नाराजी असण्याचे कारणच नाही. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस कोअर कमिटीमध्ये बसून निर्णय घेत असतो. पक्षाच्या हिताच्यादृष्टीने आणि भविष्यात काय याचा सारासार विचार करून निर्णय घेतला गेला आहे. पक्षात कुठलीच नाराजी नाही आणि महायुतीतही नाराजी अजिबातच नाही असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

 

उमेदवारी अर्ज दाखल करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, कृषीमंत्री धनंजय मुंडे, महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण आदींसह पक्षाचे आमदार व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *