• Sun. May 19th, 2024

Xtralarge News

आपल्या माणसांचा आवाज

Visits: 37 Today: 1 Total: 3556964

अकलूज, दि.१४ एप्रिल:

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी डाव टाकला आणि अकलूजच्या मोहिते पाटलांनी तुतारी हाती घेतली. शिवरत्न या विजयसिंह मोहिते पाटील यांच्या बंगल्यावर शरद पवार, सुशिलकुमार शिंदे व मोहिते पाटील तसेच शेकापचे जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शरद पवारांनी मोहिते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याचे व धैर्यशिल माढ्यातून लढणार असल्याचे जाहिर केले. सोबत करमाळ्यातील शिंदेसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांनीही पवारांसोबत येण्याचा निर्णय घेतला. आता बारामती, सोलापूर व माढा तिन्ही मतदारसंघाची किल्लेबंदी भक्कम करून भाजपाला धोबिपछाड देण्याची पक्का गाठ शरद पवारांनी बांधली आहे.

 

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की,

माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांनी निवडणूक लढवावी अशी आमच्या सगळ्यांची इच्छा होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील येथे येतील आणि पक्षाच्या नेत्यांच्या उपस्थितीत धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पक्षप्रवेशाचा निर्णय होईल. याचबरोबर लोकसभेसाठी अर्ज भरण्याची तारीख १६ एप्रिल आहे. सोलापुरात दोन्ही उमेदवार लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरतील असे शरद पवार यांनी सांगितले.

 

शरद पवार म्हणाले की, सोलापूर जिल्हा हा पुरोगामी गांधी,नेहरू यांच्या विचारांचा पुरस्कर्ता राहिलेला आहे. या जिल्ह्याचा इतिहास बघितला तर येथील महाविकास आघाडीचे आमचे उमेदवार प्रणिती शिंदे आणि धैर्यशील पाटील हे दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील याची खात्री आहे असेही शरद पवार म्हणाले.

 

मागील निवडणुकीत आम्हाला जास्त जागा मिळाल्या नव्हत्या. चार जागा राष्ट्रवादीला, एक जागा काँग्रेसला आणि एक जागा एमआयएमला मिळाली होती. हे पाच सहा जागांचे चित्र यंदा कितीतरी पटीने वाढलेले असणार आहे. तसे भाजपने ५४३ चा आकडा सांगणे योग्य होईल असे म्हणत त्यांनी ४०० पार च्या घोषणेवरून टोलाही लगावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *