• Fri. Jun 14th, 2024

Xtralarge News

आपल्या माणसांचा आवाज

Visits: 105 Today: 1 Total: 3585681

अवकाळीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्या.

मुंबई, दि. २७ फेब्रुवारी:

विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसासह मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरकारने तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देऊन शेतकऱ्यांना मदत द्यावी. तसेच धान उत्पादक शेतकऱ्यांना यापूर्वी मदत जाहीर करून देखील अद्याप त्याचा लाभ मिळाला नाही. ही मदतही तात्काळ द्यावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली.

चंद्रपूर, नाशिक, वर्धा, अकोला, यवतमाळ येथे अवकाळी पाऊस, गारपीठ मोठ्या प्रमाणात झाली आहे. द्राक्ष, संत्रा बाग, डाळिंब, गहू, हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना यापूर्वी जाहीर केलेली मदत अजूही देण्यात आली नाही. ही मदत देऊन सरकारने शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी वडेट्टीवार केली. यानंतर सरकारकडून सकारात्मक उत्तर देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *