२००४ ला NCP चा मुख्यमंत्री झाला असता पण…
पुणे दि. ११ फेब्रुवारी –
२००४ रोजी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला असता पण का झाला नाही याच्या खोलात आता जायचे नाही पण आता बघितले की, सारखे मुख्यमंत्री, मुख्यमंत्री होणार बोलत आहेत. पहिल्यांदा आपल्याला पक्ष मजबूत करायचा आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी सांगितले.
‘युवा मिशन २०२४’ या महामेळाव्यात अजित पवार बोलत होते, त. पुढे म्हणाले की, आपण भूमिका का घेतली हे पटवून सांगण्याची गरज आहे. वरीष्ठ समजून घेत नव्हते किंवा समजल्याचे फक्त दाखवत होते म्हणूनच आम्ही निर्णय घेतला. ४५ आमदार पाठीशी उभे का राहतात याचाही विचार करायला हवा होता. जगात आणि देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पर्याय नाही. त्यांना तिसर्यांदा पंतप्रधान करायचे आहे. ते अठरा – अठरा तास काम करतात. त्यांच्याकडे व्हिजन आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक मोठे प्रकल्प पूर्ण होत आहेत. ते शेतकऱ्यांना मदत करत आहेत. परकीय गुंतवणुकीत वाढ होत आहे. त्यांच्या व्हिजनचा फायदा महाराष्ट्राला करुन घ्यायचा आहे.
तुम्ही समोर बसलेले राष्ट्रवादीचे भविष्य आहात. भाजपसोबत सत्तेत सहभागी झालो असलो तरी आपली विचारधारा कायम आहे. कुणाचे फोन आले तर हळवे बनू नका..चलबिचल तर अजिबात होऊ नका. मी तुम्हाला सारखा फोन करु शकणार नाही पण तुमच्या विकासासाठी नेहमीच काम करेन असा विश्वासही अजित पवार यांनी दिला.
१२ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या ‘स्वराज्य सप्ताहा’ निमित्ताने राज्यातील नागरिकांना सहभागी होण्यासाठी अजितदादा पवार यांनी पत्र लिहिले आहे. त्याचे वाचनही त्यांनी केले. तर १२ फेब्रुवारी स्वराज्य सप्ताहात
घेतली जाणारी शपथ यावेळी युवा वर्गाला अजित पवार यांनी दिली.निवडणुकांसाठी राजकारण करत नाही तर युवकांसाठी काम करतो हे युवकांना वाटले पाहिजे. तुमच्याकडून चांगले प्रस्ताव आले तर त्याचा युवा धोरणात नक्कीच समावेश केला जाईल असा शब्द अजित पवार यांनी युवकांना दिला.
