• Tue. Feb 27th, 2024

Xtralarge News

आपल्या माणसांचा आवाज

Visits: 65 Today: 1 Total: 3422451

गरिब ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू नका..

शहापुर, दि. ३० नोव्हें :

आमचा मराठा सामाजाच्या आरक्षणाला विरोध नाही मात्र गरीब ओबीसी घटकाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिले जावे अशी आमची मागणी आहे. संविधानाच्या चौकटीत राहून मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशीच आमची मागणी असल्याचे मत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे…

 

शहापूर येथे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू नये यासाठी उपोषणाला बसलेल्या भरत निचीते यांची छगन भुजबळ यांनी भेट घेतली आणि उपोषण सोडविले. यावेळी आ.किसन कथोरे, राष्ट्रीय ओबीसी महासंघ ठाणे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रकाश भांगरथ, करण दौलत दरोडा, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील इत्यादी मान्यवरांसह मोठा जनसमुदाय उपस्थित होता…

यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, भरत निचीते हे २६ नोव्हेंबर पासुन आमरण उपोषणाला बसलेले होते. त्यामूळे या भागातील समाज जागा झाला. नीचिते यांचे कार्य निश्चित सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. या छोट्याशा गावात आपण हजारो जण जमा झाले आपल्याला मी सलाम करतो.

अवकाळी मुळे नुकसान झालेल्या नाशिकच्या शेतकऱ्यांच्या बांधावर गेलेले असताना मंत्री छगन भुजबळ यांना काही मंडळींनी विरोध केला मात्र त्यांचा देखील चांगलाच समाचार छगन भुजबळ यांनी यावेळी घेतला… काळया झेंड्यावाल्यांनी त्यांचे तोंड तिकडेच काळे करा. ओबीसी ही रडणारी नाही तर लढणारी जात. पाच पन्नास कार्यकर्ते विरोध करतात मात्र लाखोंचा जनसमुदाय आमच्या पाठीशी असल्याचे त्यांनी यावेळी जनसमुदायाला सांगितले…

 

राज्यात निर्माण झालेल्या आरक्षण प्रश्नावर पर्याय म्हणजे जातनिहाय जनगणना करणे बिहार मध्ये जातानिहाय जनगणना झाली तशीच महाराष्ट्रात होणे अपेक्षित आहे. सर्वपक्षीय म्हणजे अजितदादा,चंद्रशेखर बावनकुळे, राहूल गांधी सर्व जण म्हणतात जातनिहाय जनगणना करा. मग का जात निहाय जनगणना केली जात नाही. असा सवाल उपस्थित करत शहापुर बंद ठेऊन एकजूट दाखवून दिल्याबद्दल शहापुरच्या जनतेचे कौतुक करत भरत निचिते यांना उपोषण सोडण्याची विनंती केली आणि मंत्री छगन भुजबळ यांचा आग्रह लक्षात घेता नीचीते यांनी उपोषण मागे घेतले…

यावेळी बोलताना भाजप आमदार किसन कथोरे म्हणाले जर हे कुणबी होते तर एवढे वर्ष कूठे दडून होते. ओबीसींचे आरक्षण वाचवणे आणि जातनिहाय जनगणना करण्यासाठी अधिवेशनात संघर्ष करणार आणि आम्ही सगळेच भुजबळ साहेबांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *