• Wed. Sep 27th, 2023

Xtralarge News

आपल्या माणसांचा आवाज

मोदींच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा सप्ताह’..

Visits: 68 Today: 6 Total: 3197946

मोदींच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा सप्ताह’..

मुंबई, दि. १८ सप्टेंबर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस “सेवा सप्ताह” म्हणून साजरा करण्यात येत आहे. या सेवा सप्ताहाची सुरुवात मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनात विविध उपक्रमांनी झाली.

वांद्रे पश्चिम विधानसभेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी मोफत चष्मा वाटप करण्यात आले. खा. मनोज कोटक, आ. राम कदम यांच्या पुढाकाराने  घाटकोपर (प) विधानसभा आनंद नगर कार्यालय येथे आरोग्य शिबिर पार पडले. आ. मनीषा ताई चौधरी यांच्या उपस्थितीत दहिसर विधानसभा मतदारसंघात चाइल्ड हेल्थ फाऊंडेशनच्या  माध्यमातून ० वर्ष ते २ वर्ष वयोगटातील शिशु बालकांना मोफत बेबी सॅकचे वाटप करण्यात आले. आ. पराग शाह यांनी घाटकोपर (प.) येथे जनजागृती शिबिर घेतले. चारकोप येथे आमदार सुनील राणे यांनी तर विलेपार्ले येथे आ. पराग अळवणी यांनी मोफत नेत्र तपासणी शिबिर घेतले. आ. भारती लव्हेकर यांनी वर्सोवा विधानसभेत रक्तदान शिबिराचे आयोजन केले. भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईच्या वतीने तजिंदर सिंग तिवाना यांच्या पुढाकाराने मुंबईतील ३६ विधानसभेत भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. भाजयुमो मुंबई सचिव नितिन गुप्ता यांनी वर्सोवा विधानसभेत “रक्तदान महोत्सव” घेतला.

 

यानिमित्ताने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर पर्यंत सेवा सप्ताह अंतर्गत विविध सेवा प्रकल्प घेण्यात येणार आहेत. सरकारी योजना सेल अंतर्गत केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजना पथनाट्याच्या माध्यमातून मुंबतील जनतेसमोर मांडण्यात येणार आहेत. ओबीसी मोर्चा अंतर्गत प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनाचे २३ ठिकाणी लाईव्ह कार्यक्रम करण्यात येणार आहेत. या योजना संदर्भातील कार्यक्रम रंगशारदा, वांद्रे पश्चिम येथे रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे आणि खा. पूनम महाजन यांच्या उपस्थित होणार आहे. युवा मोर्चा अंतर्गत २० ठिकाणी भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. मुंबईतील प्रत्येक विधानसभेत आरोग्य शिबिर व आयुष्यमान भारत कार्डचे कॅम्प आयोजित करण्यात येणार आहेत. कांदिवली पूर्व विधानसभा आ. अतुल भातखळकर यांच्या मार्फत ‘मेरी माटी मेरा देश’ अभियानाअंतर्गत प्रत्येक बूथ व शक्ति केंद्र स्तरावर रथ यात्रा आयोजित करण्यात येत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *