भोंदू बाबा व राम कदमांवर विनयभंगाचे गुन्हे दाखल करा…
मुंबई, दि १५ सप्टेंबर ;
राज्यात आंध्र श्रद्धा निर्मूलनचा कायदा असताना देखील असे प्रकार घडतातच कसे ? राज्यात पोलीस नाहीत का? कंबलवाला बाबा महिलांसोबत करत असलेले कृत्य हे निंदनीय आहे. पोलिसांनी यासंदर्भात कंबलवाला बाबा आणि आयोजकांवर विनयभंगाचे गुन्हे दाखल करावेत. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्या चव्हाण यांनी केली आहे.
कंबलवाला बाबा यांच्याकडून करण्यात येत असलेल्या बुवाबाजीचे प्रकार ताबडतोब थांबवण्यात यावे तसेच त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षातील आमदार राम कदम यांच्याकडून असे प्रकार होत आहेत. त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे. परंतु हे कोण करणार असा प्रश्न देखील यामुळे उपस्थित होत आहे. असे विद्या चव्हाण यांनी यावेळी म्हटले आहे.
विद्या चव्हाण म्हणाल्या की राम कदम यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांच्या कुटुंबीयांना जर याचा फायदा झाला असेल तर राम कदम बुवाबाजीच्या नादाला लागले आहेत. जर यामधून महिलांची छेडछाड होत असेल तर पोलीस जर कारवाई करत नसतील तर राष्ट्रवादी काँग्रेस अशा भोंधुगिरी करण्याऱ्या लोकांना धडा शिकवण्याकरिता समर्थ आहे. तसेच भोंदू बाबा आणि आयोजक यांच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. जर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला नाही. तर पोलीस स्टेशन समोर राष्ट्रवादी काँग्रेस महिला च्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील बोलताना दिला आहे.