• Wed. Sep 27th, 2023

Xtralarge News

आपल्या माणसांचा आवाज

Visits: 13 Today: 1 Total: 3198082

नीलमताईंचे समाजकार्य नव्या पिढीला कळेल.

मुंबई, दि. १४ सप्टेंबर ;

ग्रामीण, दुर्गम, आदिवासी भागातील महिलासाठी नीलमताईंचे सामजिक कार्य कायमच सुरू असते. त्यांच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रातील केलेल्या कामांचा आणि अनुभवाचा फायदा नक्कीच सर्वांना होईल.त्यांचे कार्य, विचार या पुस्तकातून समाजापुढे आले असून नीलमताईंचे राजकारणापलीकडचे समाजकारण या पुस्तकाच्या माध्यमातून नव्या पिढीला कळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

 

 

डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या ‘एैस पैस गप्पा नीलमताईंशी’ या पुस्तकाचे राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राजभवन मुंबई येथे प्रकाशन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, नीलमताई गोऱ्हे या ध्येयवादी विचारसरणीच्या विचारवंत आहेत. समाजासाठी, महिलांसाठी काय करू शकतो यासाठी सतत प्रयत्नशील असतात. नेहमी मदतीसाठी सहानुभूतीची भावना त्यांची असते. या पुस्तकाच्या नावाप्रमाणेच त्यांचा स्वभाव देखील आहे. जे मनात असते ते स्पष्ट बोलतात. विधान परिषदेच्या उपसभापती या महत्त्वाचे पदावर काम करत असतानाही विधान परिषदेत सर्वांना न्याय देण्याची व मदतीची त्यांची नेहमीच भूमिका असते. देशात महाराष्ट्र हे महिला धोरण आणणारे पहिले राज्य आहे. या धोरणात त्यांनी खूप चांगल्या सूचना केलेल्या आहेत व नवीन तयार होणाऱ्या धोरणाबाबत सातत्याने पाठपुरावा करतात. शिवसेनेच्या इतिहासातली पहिली महिला शिवसेना नेता नीलमताई आहेत. त्यांच्या राजकीय सामाजिक कार्याच्या अनुभवाचा फायदा नक्कीच सर्वांना होईल.महिला आरक्षण विषय,मराठवाडा विद्यापीठ नामांतर यामध्ये त्यांचे मोठे योगदान राहिले आहे.

 

मुख्यमंत्री शिंदे यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांचा यावेळी सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाला, सामाजिक आणि राजकीय कार्य करत असताना वेळ ही खूप महत्त्वाची असते. वेळ देणे, घेणे आणि ती ठरलेली वेळ पाळणे ही मोठी कसरत असते परंतु लेखिका करुणा गोखले यांनी या पुस्तकांसाठी खुप मेहनत घेऊन वेळेचे नियोजन केले आणि या पुस्तकाचा प्रवास पूर्ण केला. कोणतेही कार्य आपण सांगितले नाही तर ते कळणार नाही सामजिक दायित्व म्हणून हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं. या पुस्तकाचा प्रवास आणि अनुभव व्यक्त करून सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून राष्ट्रगीत आणि राज्यगीताने करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *