बीएमसी निवडणुकीत उद्धवसेना ५० च्या आतच !

0
IMG-20230521-WA0096

बीएमसी निवडणुकीत उद्धवसेना ५० च्या आतच !

मुंबई, दि, २१ मे :
गेल्या २५ वर्षात मुंबईकरांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला आणि त्यांच्या शिवसेनेला प्रत्येक निवडणुकीत नाकारले. कायम घरचा रस्ता दाखवला.भाजपाच्या समर्थनामुळे शिवसेनेचे आकडे खाली जात असतानाही खुर्च्या उबवत होता कारण हिंदुत्वासाठी तुम्हाला समर्थन देत होतो. आता परिस्थिती बदलली आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ५० चा आकडाही पार करू शकणार नाही असे भाकीत मुंबई भाजपा अध्यक्ष आ. अ‍ॅड. आशिष शेलार यांनी केले आहे.

मुंबई भारतीय जनता पार्टीच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पक्ष कार्यकारिणी बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेवर टीका करताना शेलार पुढे म्हणाले की, १९९७ साली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे १०३ नगरसेवक होते. ९७ ते २००२ या काळात हा आकडा ९७ वर आला त्यानंतर ते ८४ वर आले. २०१२ मध्ये तर ही संख्या ७५ वर आली. २०१७ मध्ये ८४ हा आकडा आला, ते आमच्या सरकारचे भाग होते म्हणून झाले. त्या फायद्यावर ८४ चा आकडा गाठला. राज्यात सरकारमध्ये नसते तर त्याच वेळेला हा आकडा ६० वर आला असता, यावेळी उद्धव यांची शिवसेना मुंबई महापालिका निवडणुकीत पन्नास चा आकडाही पार करू शकणार नाही. ही आकडेवारी त्याचा पुरावा आहे म्हणून मुंबईकरांनी यांना नाकारले, झिडकारले.

मुंबईकरांनी कधीच त्यांना आपले म्हणणे देखील टाळले आहे. मुंबईकरांचा प्रामाणिकपणावर भरोसा आहे, उबाठा शिवसेनेचे पाकीट मारीत मोठे नावच आहे. पाकीट मारीचा धंदा करणारे महापालिकेतले आणि मविआचे अट्टल चोरांनी मुंबईला लुटले आहे. प्रामाणिक काम करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुंबईकर उभे राहतील याबद्दल माझ्या मनात बिलकुल शंका नाही, असेही आ. अ‍ॅड. आशिष शेलार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *