भाजपाचा बालेकिल्ला कसब्याला काँग्रेसचा विजयी सुरुंग..

0
kasaba 99

भाजपाचा बालेकिल्ला कसब्याला काँग्रेसचा विजयी सुरुंग..

पुणे, दि. २ मार्च :

कसबा आणि पिंपरी चिंचवड मतदारसंघासाटी झालेल्या पोटनिवडणुकीत कसबा पेठ मधून काँग्रेसचे उमेदावर रविंद्र धंगेकर यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. धगेंकर यांनी भाजपाच्या हेमंत रासनेंवर ११ हजार मतांनी विजय मिळवला आहे. २८ वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेल्या गडाला धंगेकरांनी सुरुंग लावला आहे.  मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच रविंद्र धंगेरकर यांनी आघाडी घेतली ती विजयापर्यंत कायम होती. शनिवार-सदाशिव आणि नारायण पेठ जो भाजपचा बालेकिल्ला मानला जायचा त्यातही जनेतने धंगेकरांना साथ दिली. अपेक्षेप्रमाणे रविवार-शुक्रवार पेठ तसेच लोहियानगर आणि मोमिनपुरा भागातून रवींद्र धंगेकर यांच्यावर जनतेने विश्वास ठेऊन त्यांना भरघोस मतदान केले.

कसबा मतदारसंघात गिरिश बापट व त्यानंतर मुक्ता टिळक यांनी विजयाची पताका कायम ठेवली होती. भाजपाचा हा बालेकिल्ला या पोटनिवडणुकीत मात्र उध्वस्त झाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पाच ते सहा मंत्री कसब्यात तळ ठोकून होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील शेवटचे सहा दिवस कसब्यातच होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही कसब्यात जातीने लक्ष ठेऊन होते. तरीही कसाब्यात भाजपाला पराभव पत्करावा लागला. अमरावती व नागपूर विधान परिषदेतील पराभवानंतरचा हा आणखी एक मोठा धक्का भाजपाला बसला आहे.

पिंपरी-चिंचवडमधून मात्र भाजपाच्या अश्विनी जगताप यांनी विजय मिळवत जागा कायम राखली. लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे या जागेवर निवडणुक झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाना काटेंना बंडखोर राहुल कलाटे यांच्या उमेदवारीमुळे फटका बसला. बंडखोरी रोखण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश आले असते तर चित्र वेगळे असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *