मुंबईतील ६ हजार कोटी रुपयांच्या रस्ते टेंडरमध्ये घोटाळा !

0
aditya t

मुंबईतील ६ हजार कोटी रुपयांच्या रस्ते टेंडरमध्ये घोटाळा !

मुंबई, दि. १४ जानेवारी

मुंबईतील रस्त्यांच्या टेंडरमध्ये महाघोटाळा झाला असल्याचा गंभीर माजी मंत्री व युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केला आहे. मुंबईतील ४५० किमी रुस्त्यांचे पाच हजार कोटी रुपयांचे टेंडर ही धुळफेक असून हे टेंडर ६ हजार कोटी रुपयांचे आहे. या टेंडरमध्ये कंत्राटदारांचे जास्तीचा नफा मिळणार असून मुंबई महापालिकेतील पैशांची लुट केली जात आहे. असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

मुंबईतील रस्त्याच्या कामाच्या कंत्राटावरून आदित्य ठाकरे यांनी गंभीर आरोप केले. महाराष्ट्रात आलेले खोके सरकार हे फक्त मुंबई विरोधी नाही तर महाराष्ट्र विरोधी आहे. मुंबईचा वापर एटीएम म्हणून करत आहेत म्हणत माझी मुंबई विकू नका, तिचे एटीएम करू नका.

खोके सरकारने मुंबई महापालिकेची लूट सुरू केली आहे. पाच हजार कोटी रुपयांचे रस्त्यांचे टेंडर धुळफेक असून ४५० किमीच्या रस्त्यांचे ६०८४ कोटींचे टेंडर आहे. फेब्रुवारीत काम सुरु केले तरी काम कधी होणार? मुंबईत कामं करण्याचा करण्याचा कालावधी हा १ ऑक्टोबर ते ३१ मे असा असतो कारण बाकीच्या कालावधीत पाऊस पडतो. पावसाळ्यानंतर सुरू झालेली कामं पावसाळ्याच्या आधी पूर्ण केली जातात. मात्र आत्ता हाती घेतलेली काम पावसाळ्याच्या आधी पूर्ण होतील का? याचा अभ्यास केला गेलेला नाही. या सगळ्या गोष्टी घडत असताना ४८ टक्के फायदा कंत्राटदारांना करून देण्यात आला आहे. महापालिकेत कोणतीही बॉडी नसताना महापौर किंवा लोकप्रतिनिधी नसताना प्रशासकांनी ही कामं मंजूर कशी केली, हा प्रश्न मुख्य आहे.

टेंडरची जी खिरापत वाटण्यात आली आहे त्या टेंडरचा पैसा मुंबईकरांच्या खिशातला आहे. कामाची समज नसतानाही टेंडर्स काढण्यात आली. मुंबईतलं टेंडर हे इतर टेंडरपेक्षा वेगळं असतं. मुंबईत सिमेंटचे रस्ते केले जात आहेत. मग गेल्या सात वर्षांपासून आताचे मुख्यमंत्री आहेत ते मंत्री होते, त्यावेळी त्यांनी ठाण्यातले रस्ते काँक्रिटचे का केले गेले नाहीत? असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी केला आहे.

माझा घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना प्रश्न आहे. मार्च २०२२ च्या २ हजार कोटींच्या कामाला ३ वर्ष लागणार हे त्यांनी सभागृहामध्ये सांगितलं. मग या सहा हजार कोटींच्या कामाला किती वर्ष लागणार? हे टेंडर स्क्रॅप करून रिकॉल करा ही आमची मागणी आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *