• Wed. Dec 4th, 2024

Xtralarge News

आपल्या माणसांचा आवाज

Visits: 630 Today: 1 Total: 3911662

छोट्या सर्वेशचे स्वप्न राहुल गांधींनी साकारले…

नांदेड, दि. 11 नोव्हेंबर :

भारत जोडो यात्रेदरम्यान नांदेडच्या वाटेवर असताना राहुल गांधी यांना दोन मुलांनी सॉफ्टवेयर इंजीनियर व्हायचे बोलून दाखवले पण आपण आजपर्यंत संगणक पाहिला नाही व आपल्या शाळेतही नसल्याचे सांगितले.

शाळेत संगणकच नाही तर या मुलाचे स्वप्न कसे पूर्ण होणार हे जाणून राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेस अध्यक्ष श्री. मल्लिकार्जुन खर्गे यांनी सर्वेश या मुलाला संगणक भेट दिला. आता या मुलाच्या स्वप्नाला बळ मिळाले. पण ही एका मुलाची गोष्ट झाली, हिंदुस्थानमधील प्रत्येक मुलाचे स्वप्न साकार करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

देशातल्या प्रत्येक मुलाने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे आधुनिक तंत्रज्ञानाचे स्वप्न पूर्ण करावे. परंतु भाजपा सरकारच्या नाकर्तेपणामुळे लाखो मुले कोरोना काळात संगणक नसल्याने ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहिले. भारत जोडो यात्रा अशा स्वप्नांना मुर्त रुप देण्याचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *