उद्धवजी, तुम्ही महमंद गजनीचा एजंट बनत आहात का?

0
BJP

उद्धवजी, तुम्ही महमंद गजनीचा एजंट बनत आहात का?

मुंबई, दि. ३१ ऑक्टोबर;

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठी मुस्लिम हा छुपा डाव उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून खेळला जातो आहे. हिंदूमध्ये दोन गट मांडण्याचे धाडस ओवेसीनीसुद्धा केले नाही ते धाडस शिवसेना उद्धव ठाकरे गटाने केले आहे. औरंगजेबाचे स्वप्न पूर्ण करण्याबरोबर तुम्ही आता महमंद गजनीचा एजंट बनत आहात का ? असा प्रश्न मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे.

मतांसाठी मराठी माणसाला भुलवायच आणि मुस्लिमांना फसवायच असं धर्माचं मतांच राजकारण करण्यापूरते उद्धव ठाकरे थांबलेले नाहीत तर शिवसेना उद्धव ठाकरे गट आता पुढे विघटनाकडे चालला आहे. हिंदूमध्ये विघटन कसे होईल यासाठी हळुवार पेरणी केली जात आहे आणि टूलकिटच्या माध्यमातून हिंदू आणि वेगळे नव हिंदू असे दोन गट तयार केले जात आहेत. जागर मुंबईचा या कार्यक्रमात विकासविरोधी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून भ्रम पसरविण्याच्या, तुष्टीकरणाबाबत समस्त मुंबईकराना अवगत करणार आहोत.

जागर मुंबईचा या कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून आमदार अतुल भातकळकर यांच्यावर जबाबदारी देण्यात येत आली आहे. जागर मुंबईचा यातून मुंबईकरांसमोर सत्य घेऊन जाणार आहोत. उद्धव ठाकरे यांना मराठी मुस्लिम अजेंडा चालतो पण मराठी जैन, मराठी गुजराती, मराठी उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय आणि तर मराठी हिंदू हा अजेंडा चालत नाही याचं कारण काय आहे? महाराष्ट्र आणि मराठीवर कब्जा करण्याचे औरंगजेब जे स्वप्न होते ते पूर्ण करण्याचे काम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे  गट करू पाहतय का? आता ते त्याच्या एक पाऊल पुढे गेले आहेत. ते केवळ मतांच्या तुष्टीकरणापुरते थांबलेले नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *