मुस्लिम आरक्षणाबाबत शिंदे-फडणवीस सरकारने भूमिका स्पष्ट करावी

0
NCP

मुस्लिम आरक्षणाबाबत शिंदे-फडणवीस सरकारने भूमिका स्पष्ट करावी

मुंबई, दि. २६ सप्टेंबर; –

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडी सरकारने मुस्लिम समाजातील मागासलेल्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजीकदृष्ट्या पाच टक्के आरक्षण देण्याची तरतूद केली होती. शिंदे – फडणवीस सरकारचे या आरक्षणावर काय म्हणणे आहे हे स्पष्ट करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.

राज्यातील ५६ मुस्लिमबहुल शहरातील मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणाचे सर्वेक्षण ‘टीस’ या संस्थेच्या माध्यमातून राज्य सरकार करणार आहे. मुळात देशपातळीवर मुस्लिम समाजाबद्दल भाजपची काय भूमिका आहे हे वेगळे सांगायला नको असा टोलाही महेश तपासे यांनी लगावला आहे.

सबका साथ, सबका विकास हा मंत्र नरेंद्र मोदी यांनी दिला मात्र २०१४ नंतर भाजप राजवटीत मुस्लिम समाजाबाबत काय काय घडलं हे सांगण्याची आवश्यकता नाही. आता राज्य सरकार हे सर्वेक्षण करत आहे मात्र राज्य सरकारचा हेतू शुद्ध असेल तर त्यांचे स्वागत आहे असेही महेश तपासे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *