… म्हणजे ही मोदी पर्व संपत आल्याची नांदी आणि कबुली !
… म्हणजे ही मोदी पर्व संपत आल्याची नांदी आणि कबुली !
मुंबई, दि. 20 ऑगस्ट ::
देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत भाषण करताना आपल्याला बाळासाहेबांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मुंबई महानगर पालिकेत सत्ता मिळवायची आहे म्हणत बाळासाहेबांच्या नावाने मते मागायचा केविलवाणा प्रयत्न केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नरेंद्र मोदींच्या नावाने मते मागून उपयोग होणार नाही हेच एकप्रकारे अधोरेखित केले असून मोदी पर्व संपल्याचीच ही नांदी आणि कबुली आहे असा घणाघाती हल्ला शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
फडणवीसांच्या वक्तव्याचा समाचार घेत ठाकरे पुढे म्हणाले की, भाजपच्या धोरणानुसार वापर संपला की नवीन नाव शोधायचे आणि त्यांच्या नावाने मते मागायची आणि आपली सत्तेची तळी भरायची असाच हा प्रकार आहे. यानिमित्ताने भाजपचा खरा चेहरा देवेंद्र फडणवीस यांनी समोर आणला. महाराष्ट्रातील जनता यांना मतपेटीतून याचे उत्तर देईलच असेही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटले आहे.
