एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर फडणवीस उपमुख्यमंत्री !
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर फडणवीस उपमुख्यमंत्री !
मुंबई, दि. 30 जून :
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी अत्यंत वेगाने घडल्या , कहानी मे ट्विस्ट येत गेला आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. हे खूपच आश्चर्यकारक घटना घडली. यात कुणी कुणाचा गेम केला हे कळलंच नाही. ही फडणवीस यांना चपराक तर नाही ना अशी चर्चा सुरू झाली आहे

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एकनाथ संभाजी शिंदे यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. राजभवन येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात राज्यपालांनी देवेंद्र गंगाधर फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली.

राष्ट्रगीताने शपथविधी सोहळ्याची सुरुवात झाली. त्यानंतर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांना राज्यपालांच्या अनुमतीने शपथ घेण्यास पाचारण केले. राष्ट्रगीताने शपथविधी सोहळ्याची सांगता झाली.
कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, कपिल पाटील व डॉ भागवत कराड, खासदार मनोज कोटक, माजी मंत्री चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, अनेक आमदार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कुटुंबीय तसेच वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते.
तत्पूर्वी दुपारी एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची राजभवन येथे भेट घेऊन राज्यात सत्तास्थापनेचा दावा सादर केला. त्यानंतर राज्यपालांनी त्यांना शपथ घेण्यास पाचारण केले.
