उद्धव ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगा !

0
images (57)

उद्धव ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगा !

मुंबई, दि. 29 जून :
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी वेगाने होत आहेत.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी
दिल्लीत जाऊन वरिष्ठांशी चर्चा केली. रात्री मुंबईत परतताच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली. महाविकास आघाडी सरकार अल्पमतात असून त्यांना बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश  द्यावेत, अशी मागणी केली.

फडणवीस, चंद्रकांत पाटील,  मुनगंटीवार, शेलार व इतर नेत्यांसह राज्यपाल यांना पत्र दिले. या पत्रात मांडलेले महत्त्वाचे मुद्दे असे :

भाजपा-शिवसेनेने एकत्रितपणे निवडणुका लढविल्या होत्या. परंतू निवडणुकीनंतर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केले. शिवसेनेत गेल्या 8-9 दिवसांपासून अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे आणि त्यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत आता आघाडी नको आहे. शिवसेनेचे 39 आमदार ही आघाडी संपुष्टात येण्याच्या बाजूने आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत बहुमत गमावले आहे.

 

दुसरीकडे शिवसेनेच्या या आमदारांना धमक्या दिल्या जात आहेत. त्यांचे 40 मृतदेह गुवाहाटीतून परत येतील, असे जाहीरपणे राज्यसभा सदस्य संजय राऊत सांगत आहेत. शिवाय शिवसेनेचे इतरही नेते अशाच प्रकारची धमकीयुक्त भाषा वापरत आहे. यासंदर्भात सर्व पुरावे सोबत जोडले आहेत. संसदीय लोकशाहीत सभागृहातील बहुमत ही सर्वोच्च बाब असल्याने आणि त्याशिवाय, ते सरकार अस्तित्त्वात राहू शकत नसल्याने तातडीने मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगावे, ही माझी राज्यपालांकडे विनंती आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे विविध दाखले सुद्धा देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *