एकनाथ शिंदेंवर शिवसेनेची मोठी कारवाई!

0
456

एकनाथ शिंदेंवर शिवसेनेची मोठी कारवाई!

मुंबई, दि. २१ जून:

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे बंड केले असताना उद्धव ठाकरे यांनी कठोर भूमिका घेत बंडखोरांसमोर नमते घेणार नसल्याचे दिसते. एकनाथ शिंदेंनी बंड पुकारल्यानंतर पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिंदे यांची शिवसेनेच्या विधीमंडळ गटनेते पदावरुन बडतर्फ करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांचा निर्णय म्हणजे एकनाथ शिंदे यांचे बंड मोडून काढण्याची तयारी दिसते.

एकनाथ शिंदेंनी गटनेतेपदावरून काढल्यानंतर आमदार अजय चौधरी यांच्याकडे शिवसेनेच्या गटनेते पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.मातोश्रीवर शिवसेनेच्या आमदारांसोबत झालेल्या बैठकीनंतर उद्धव ठाकरेंनी या पदावरुन एकनाथ शिंदेंना हटवण्याचा निर्णय घेतला. २०१९ पासून एकनाथ शिंदे यांच्याकडे गटनेतेपद होते. गटनेते हे विधानसभेतील एक महत्वाचे पद आहे. एकनाथ शिंदेंकडून हे पद काढून घेऊन त्यांचे परतीचे दोर कापले असल्याचे संकेत दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *