सफाई कर्मचारी वयाच्या ५० व्या वर्षी दहावीची परीक्षा उत्तीर्ण..
मुंबई, दि. २० जुन :
अनेकवेळा कुटुंबाच्या परिस्थीतीमुळे देखील शिक्षण घेण्यास अडथळे निर्माण होतात. शिक्षण घेण्यासाठी वय आणि कालमर्यादा नसते हे अगदी खरे आहे. मुंबई महापालिकेत सफाई कामगार म्हणून कार्यरत असलेले ५० वर्षीय कुंचीकोर्वे मशन्ना रामाप्पा दहावी बोर्डाची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात ५७.४० टक्के मिळवून उत्तीर्ण केली आहे. वयाच्या ५० वर्षी दहावी ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे आम आदमी पार्टीच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला.
रामाप्पा यांचा अंधेरी येथील चकाला येथे आम आदमी पार्टीच्या कार्यालयात पक्षाचे नेते राहुल कपूर आणि सुरेश आचार्य यांच्यासह अनेक नेत्याच्या प्रमुख उपस्थिती सत्कार करण्यात आला. आम आदमी पार्टीने शैक्षणिक मॉडेलसाठी देशभरात आपले नाव प्रसिद्ध केले आहे. वय असूनही रामप्पा यांच्या शिक्षणासाठी केलेल्या समर्पणाला सलाम केला आहे.
कुंचीकोर्वे मशन्ना रामाप्पा यांच्या प्रयत्नांना आणि चिकाटीला आम आदमी पार्टी सलाम करते. आता ते केवळ दहावी उत्तीर्ण झाल्यावरच थांबणार नाहीत तर पदवीपर्यंतचे शिक्षणही पूर्ण करणार आहेत. तर संपुर्ण भारतात त्यांच्या शिक्षणाच्या चिकाटीच्या आदर्श डोळ्यासमोर घ्यावा.तसेच भारतात चांगले शिक्षण सर्वव्यापी बनवण्यासाठी आणखी प्रेरणा देते असे मत आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा व राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या प्रीत शर्मा मेनन यांनी व्यक्त केले.