‘अग्निपथ’ विरोधात सोमवारी राज्यभर राष्ट्रवादी युवकांचे आंदोलन 

0
images (25)

‘अग्निपथ’ विरोधात सोमवारी राज्यभर राष्ट्रवादी युवकांचे आंदोलन..

मुंबई दि. १९ जून :

केंद्र सरकारच्या ‘अग्निपथ’ योजनेला राष्ट्रवादी युवक काँग्रेसने विरोध केला असून सोमवार दिनांक २० जून रोजी राज्यभरात आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली.

 

ज्या पध्दतीने तीन कृषी कायदे केंद्रसरकारने आणून शेतकऱ्यांना नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला होता तसाच काहीसा प्रयत्न भारतीय सैन्यात कंत्राटी पद्धतीने भरती करुन केला जाणार आहे त्यामुळे ही योजनाच रद्द करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसची आहे.

यासाठीच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या नेतृत्वाखाली २० जूनला राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येणार आहे असेही महेश तपासे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *