क्रांती गाथा’ व जलभूषण दोन्हीही देशासाठी प्रेरणादायी..

0
IMG-20220614-WA0165

क्रांती गाथा’ व जलभूषण दोन्हीही देशासाठी प्रेरणादायी..

मुंबई, दि. 14 जून :
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना इतिहासाच्या पाऊलखुणा जपणारे ‘क्रांती गाथा’ ही अत्यंत प्रेरणा देणारा उपक्रम असून हे भूमिगत दालन व जलभूषण सारखी नवीन वास्तू देशाला प्रेरणा देणारी ठरेल असे उद्गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काढले.

राजभवन येथे ‘क्रांती गाथा’ भूमिगत दालन व राज्यपालांच्या ‘जलभूषण’ निवासस्थानाच्या उदघाटन पर कार्यक्रमानंतर ते बोलत होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले, ‘क्रांती गाथा’ भूमिगत दालन व जलभूषण ही नवी वास्तू हे दोन्हीही देशासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. राज्यपाल यांनी म्हटंल्याप्रमाणे ‘राजभवन’ हे लोकभवन म्हणून नावारूपास येईल. आज आपण एका चांगल्या कार्यक्रमासाठी सर्वजण उपस्थित आहोत ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. यापूर्वीही मी अनेकदा राजभवनात आलो आहे.राजभवनाचे हे बदलले रूप निश्चीतच सर्वांना प्रेरणा देणारे आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या शौर्य स्वातंत्र्यसाठी मोठे प्रेरणा देणारे आहे. देशाच्या स्वातंत्र्य चळवळी ने अनेक देशांना प्रेरित केले. संत तुकाराम ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महान व्यक्तींच्या विचारांनी घडलेला महाराष्ट्राचे देशाच्या विकासातमध्ये मोठे योगदान दिले आहे.

 

मुंबई तर स्वप्नांचं शहर आहेच आहे. मुंबई हे स्वप्नांचे शहर आहे, मात्र महाराष्ट्रात अशी अनेक शहरे आहेत जी 21 व्या शतकात देशाच्या विकासाची केंद्रे बनतील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. याच विचाराने एकीकडे मुंबईच्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण केले जात आहे आणि त्याच वेळी इतर शहरांमध्ये देखील आधुनिक सुविधांमध्ये वाढ केली जात आहे असे त्यांनी सांगितले. शिक्षण क्षेत्राला माझ आग्रहाच सांगणे आहे की नव्या पिढीला आपला इतिहास माहिती झाला पाहिजे.आपण सहलीसाठी अनेक ठिकाणी मुलांना घेवून जातो मात्र अंदमान निकोबारच्या तुरूंगही विद्यार्थ्यांना दाखविला जावा जेणेकरून स्वातंत्र्यवीर सावरकरांचे बलीदान माहिती होईल. गेल्या 60 -70 वर्षा पासून राजभवन च्या खाली बंकर होता पण कुणालाच माहीत नव्हते. आज या वास्तू निश्चीत सर्वांना माहिती होतील असाही विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *