सोनिया गांधी आणि राहुल गांधींना ईडीची नोटीस !
सोनिया गांधी आणि राहुल गांधींना ईडीची नोटीस !
नवी दिल्ली, दि. १ जून:
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी अध्यक्ष खा. राहुल गांधी यांना समन्स बजावले आहे. सोनिया गांधी यांना ८ जून रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. ईडीच्या या नोटीसीमुळे देशभरातील राजकीय वातावरण तापले आहे.
ईडीच्या नोटीशीसंदर्भात प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, सोनिया गांधी स्वतः ईडीच्या कार्यालयात जाऊन सर्व प्रश्नांची उत्तरे देतील. ईडीने नॅशनल हेरॉल्डचे प्रकरण बंद केले होते परंतु भाजपा राजकीय विरोधकांना धमकवण्यासाठी बाहुल्या असलेल्या सरकारी तपास यंत्रणांचा वापर करत आहेत. काँग्रेस नेते पवन बन्सल यांचीही नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने चौकशी केली आहे.
ईडीचा राजकीय फायद्यासाठी केंद्रातील भाजपा सरकार दुरुपयोग करत असल्याची तक्रार वारंवार केली जात आहे. विरोधी पक्षातील नेत्यांवर ईडीच्या माध्यमातून कारावाई केली जात आहे. आता सोनिया गांधी व राहुल गांधी यांनाच नोटीस पाठवल्यानंतर काँग्रेसमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
