आता घर विकताना सोसायटीच्या NOC ची गरज नाही
आता घर विकताना सोसायटीच्या NOC ची गरज नाही:
मुंबई, दि. 13 एप्रिल :
‘घर मालकाला स्वतःचा घराचा हक्क आहे. ते घर कोणाला विकावे हा त्याचा निर्णय आहे. जर एखाद्या घरमालकाला घर विकायचे असेल तर त्याकरिता सोसायटीची परवानगी कशासाठी? घर मालक आणि खरेदीदार यांच्यात सौदा झाला तर परवानगीची काहीच गरज नाही, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
पत्रकारांशी बोलत असताना जितेंद्र आव्हाड यांनी वेगवेगळ्या मुद्यांवर आणि राजकीय घडामोडींवर भाष्य केलं आहे. तसंच फ्लॅट विक्रीसाठी सोसायटीची परवानगी लागत होती, पण आता ही प्रथा मोडीत काढली आहे. घर मालकाला स्वतःचा घराचा हक्क आहे की ते घर कोणाला विकावे, एखाद्या घरमालकाला घर विकायचा असेल तर त्याकरिता सोसायटीची परवानगी कशासाठी घर मालक आणि खरेदीदार यांच्यात सौदा झाला तर परवानगीची काहीच गरज नाही. काही ठिकाणी जातीनिहाय घरे विकली जातात गुजराती गुजराती यांना जैन जैन यांना तर शाकाहारी शाकाहारी यांनाच विकतात. यामुळे महाराष्ट्र हा वेगवेगळ्या विभागांत विभागला जात आहे. मुंबई ही एकत्र राहिले पाहिजे यासाठी हा प्रयत्न आहे’ असं आव्हाड म्हणाले.
