‘काश्मीर फाईल्स’ चा पैसा काश्मीर पंडितांच्या घरांसाठी द्या

0
123

‘काश्मीर फाईल्स’ चा पैसा काश्मीर पंडितांच्या घरांसाठी द्या.

मुंबई दि. २३ मार्च:

‘काश्मीर फाईल्स’ चित्रपटाचा विषय सध्या चर्चेचा झाला असून महाराष्ट्राच्या विधानसभेतही तो चर्चेत आला. हा सिनेमा मध्यांतरानंतर बोअरींग आहे. तुम्ही तो बघायला गेलात यावर काही म्हणणे नाही फक्त चित्रपट निर्मात्याकडे १६० कोटी जमा झाले आहेत त्यातून काश्मीर पंडितांना घरे बांधण्यासाठी दान करायला सांगा, अशी मागणी जयंत पाटील यांनी सभागृहात केली.

भाजपचे सदस्य काल सभागृहात उपस्थित नव्हते असे जयंत पाटील म्हणाले त्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही ‘काश्मीर फाईल्स’ बघायला गेलो होतो ‘डंके के चोटे पे’ गेलो. काय आक्षेप घ्यायचा त्यांनी सदनाबाहेर जाऊन बोलावे असे सांगितले.यावर बोलताना जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना सुनावले.

‘काश्मीर फाईल्स’ वर जयंत पाटील बोलत असतानाच भाजप आमदार योगेश सागर खाली बसून जोरजोरात बोलून अडथळे आणत असल्याचे लक्षात येताच जयंत पाटील संतापले. खाली बसून बोलण्याची पद्धत बंद करा आम्हालाही खाली बसून बोलता येते त्यावेळी अडचण झाली तर बोलू नका असे स्पष्ट शब्दात सुनावले. सभागृहात नेहमी शांत असणारे जयंत पाटील आज मात्र संतापलेले पाहायला मिळाले.

‘काश्मीर फाईल्स’वरून जयंत पाटील विरुद्ध फडणवीस  व भाजप सदस्य अशी खडाजंगी सभागृहात पाहायला मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *