विकासाला चालना देणारा, सर्व घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प !

0
NANA KK

विकासाला चालना देणारा, सर्व घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प !

मुंबई, दि. ११ मार्च:

महाविकास आघाडी सरकारचा आजचा अर्थसंकल्प राज्याच्या विकासाला चालना देणारा आहे. शेतकऱ्यांसाठी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे, गुंतवणूक वाढवून रोजगार निर्मितीवर भर देण्यात आला आहे. समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प असून कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून राज्याला प्रगतीच्या नव्या उंचीवर घेऊन जाणारा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

महाविकास आघाडी सरकार आल्यापासून दोन वर्ष अनेक नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यातच गेला. राज्याच्या प्रत्येक विभागाचा विचार करुन त्यासाठी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. कोणताही घटक वंचित राहणार नाही याची खबरदारी या अर्थसंकल्पात घेण्यात आलेली आहे. विकासाची पंचसुत्री घेऊन आजचा अर्थसंकल्प राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जणारा ठरेल. महाविकास आघाडी सरकार सर्व समाजाला न्याय देणारे असून या सर्व घटकांचे प्रतिबिंब या अर्थसंकल्पात दिसत आहे, असे पटोले म्हणाले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *