पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे भाजपाचा विजय!

0
bjp 2

पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे भाजपाचा विजय!

मुंबई, दि. १० मार्च

उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मिळलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळेच विजय मिळाला आहे, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

विजयानंतर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून विकास कार्य केले. त्यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने सामान्य लोकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण केले. कोरोनाच्या संकटात मोदी सरकारने देशातील जनतेची सेवा केली. याच पद्धतीने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाच्या राज्य सरकारने गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड या राज्यातही सामान्य माणसासाठी काम केले. त्यामुळे भाजपाच्या यशाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाते.

भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या कार्यकाळात पक्ष संघटनेच्या विस्तारासाठी आणि बळकटीसाठी व्यापक काम करण्यात आले. भाजपा अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या नेतृत्वात पक्ष संघटना आणखी बळकट झाली. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचे रुपांतर पक्षाच्या मतांमध्ये झाले.

गोवा विधानसभा निवडणुकीतील यशाबद्दल भाजपाचे गोवा निवडणूक प्रभारी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चंद्रकांत पाटील यांनी विशेष अभिनंदन केले. निवडणूक प्रभारी म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला बिहार विधानसभा निवडणुकीत यश मिळाले होते त्यानंतर आता गोव्याची विधानसभा निवडणूक भाजपाने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात जिंकली असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. विधानसभा निवडणुकीतील यशानंतर महाराष्ट्रात भाजपाचे उद्दीष्ट आगामी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये विजय मिळविण्याचे आहे. भाजपा मुंबई महानगरपालिकेवरही भगवा झेंडा फडकवेल.

भाजपाच्या विजयाबद्दल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश कार्यालयात जल्लोष करण्यात आला. ढोल ताशांच्या गजरात, गुलालाची उधळण करत, नाचत आणि जोरदार घोषणा देत कार्यकर्त्यांनी भाजपाचा चार राज्यातील विजय साजरा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *