मध्यप्रदेश पॅटर्न प्रमाणे राज्यात ओबीसी आरक्षणाचे विधेयक मंजूर
मध्यप्रदेश पॅटर्न प्रमाणे राज्यात ओबीसी आरक्षणाचे विधेयक मंजूर.
मुंबई, दि. ७ मार्च:
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाप्रश्नी मध्यप्रदेश पॅटर्न प्रमाणे महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणाचे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. आता प्रभाग रचना, निवडणुकीच्या तारखा ठरवण्याचे अधिकार हे राज्य सरकारकडे असणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाकडे केवळ निवडणुका घेण्याचे अधिकार असणार आहेत.
हे विधेयक मंजूर झाल्याने ट्रिपल टेस्ट करण्यासाठी राज्य सरकारला कालावधी मिळणार आहे. यामुळे स्थानिक स्वराज संस्थांच्या आगामी काळात होणाऱ्या निवडणुका चार-पाच महिन्यांपर्यंत पुढे ढकलल्या जाऊ शकतात.
ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत ही महविकास आघाडी शासनाची भूमिका असून ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मध्यप्रदेश सरकारने आणलेल्या विधेयकाप्रमाणे राज्य शासन विधेयक मांडणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसापूर्वी सांगितले होते.
